यवतमाळ | ६७९ पॉझेटिव्ह, १०१३ कोरोनामुक्त, ८ मृत्यु…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या 334 ने जास्त आहे. जिल्ह्यात 679 जण पॉझेटिव्ह आले असून 1013 जण कोरोनामुक्त झाले. तसेच आठ मृत्युची नोंद आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाच, डेडीकेटेड कोव्हीड सेंटरमध्ये एक आणि खाजगी रुग्णालयातील दोन मृत्यु आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 8664 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 679 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7985 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5822 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2472 तर गृह विलगीकरणात 3350 रुग्ण आहेत.

तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 65817 झाली आहे. 24 तासात 1013 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 58418 आहे. जिल्ह्यात एकूण 1577 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.92, मृत्युदर 2.40 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 13 मे च्या मध्यरात्रीपर्यंत मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 61 वर्षीय महिला, कळंब येथील 35 वर्षीय महिला, मडकोना येथील 54 वर्षीय पुरुष, हिरडी कळंब येथील 50 वर्षीय पुरुष आणि लाडखेड येथील 65 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये दारव्हा येथील 65 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये दिग्रस येथील 60 वर्षीय महिला आणि पुसद येथील 65 वर्षीय पुरुष आहे.

गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 679 जणांमध्ये 414 पुरुष आणि 265 महिला आहेत. यात वणी येथील 117 पॉझेटिव्ह रुग्ण, बाभुळगाव 76, यवतमाळ 66, दारव्हा 57, पांढरकवडा 51, पुसद 50, घाटंजी 43, दिग्रस 40, झरीजामणी 38, कळंब 36, नेर 35, आर्णि 25 महागाव 18, मारेगाव 14, उमरखेड 4, राळेगाव 2 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 509354 नमुने पाठविले असून यापैकी 506342 प्राप्त तर 3012 अप्राप्त आहेत. तसेच 440525 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 936 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 936 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 412 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 165 बेड शिल्लक, नऊ डीसीएचसीमध्ये एकूण 506 बेडपैकी 156 रुग्णांसाठी उपयोगात, 350 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 678 उपयोगात तर 421 बेड शिल्लक आहेत.

लसीकरण : जिल्ह्यात आतापर्यंत 338788 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यात कोव्हीशिल्ड लस घेणारे 293151 जण तर कोव्हॅक्सीन लस घेणारे 45637 जणांचा समावेश आहे. तसेच बुधवारी जिल्ह्यात 5458 जणांना लस देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here