यशपाल भिंगेना मिळाला आमदारकीचा मान…! अन अडचणीत आले सतीश चव्हाण…!

नांदेड – महेंद्र गायकवाड

औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीकाँग्रेस कडून आ. सतीश चव्हाण हे उमेदवार असून त्यांनी गेल्याकांही दिवसापासून आपला प्रचार चालू केला परंतु विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव येताच महाविकास आघाडीत सत्तेत असलेली जिल्ह्यातील कॉंग्रेस नाराज असल्याने याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे यशपाल भिंगेना मिळाला आमदारकीचा मान;अनअडचणीत आले सतीश चव्हाण अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना प्रा. यशपाल भिंगे यांच्या मुळे पराभूत व्हाव लागलं त्याच यशपाल भिंगेना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून राज्यपालांना दिलेल्या यादीत स्थान दिल,

त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकिय समीकरण बदलले असून अशोकराव चव्हाण यांच्या बालेकिल्लयात राष्ट्रवादीने चव्हाण विरोधकाला बळकटी देण्याचे काम केलेल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज असून याचा मोठा फटका पदवीधर निवडणुकीत बसणार आहे.

गेल्या कांही दिवसापासून पदवीधर मतदार संघाचे आ. सतीश चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देत असून त्यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वीच आपल्या प्रचाराला सुरूवात केली.परंतु अचानक विधानपरिषद निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांचे विरोधक प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव समोर आल्याने सतीश चव्हाण यांची मोठी गोची झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here