कोगनोळीत बळीराजा प्रतीमेच पुजन…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील बस स्टँड जवळ प्रजावानी फौंडेशन आणि कोगनोळी ग्रामस्थाच्या वतीने बळीराजा महोत्सव साजरा करीत बळीराजाच्या प्रतीमेच पुजन येथील जेष्ठ नागरिक शिवाजी बेरड यांच्या हस्ते करण्यात आले.

तर श्रीफळ प्रकाश पांडुरंग परीट यांच्या हस्ते वाढविण्यात आले.प्रारंभी स्वागत प्रास्ताविक करताना अरुण पाटील म्हणाले समता, न्याय, बंधुता आणि मानवाच्या समुग्र उध्दारासाठी बळीराजा हुतात्मा झाला.

बलिप्रतिपदा हा त्यांचा हुतात्मा दिन त्यांच्या गौरवाचा दिवस मानला जातो.बळीराजा हा अतिशय गुणी ,उदार, प्रजाहित राजा होता. दिवाळी सणात प्रत्येक घरातील माता-भगिनी आपल्या भावाला ओवाळताना ईडा पिडा जाऊदे आणि बळीराजाचे राज्य येऊ दे असा उच्चार आजही हजारो वर्षानंतरही करताना पहावयाला मिळते.

ईडा याचा अर्थ अन्न अन्नावरील पिडा जाऊदे म्हणजे शेतकऱ्यावरील संकट दूर होऊ दे अशी भावना व्यक्त करतात .अशा बळीराजाचे स्मरण करणे व त्यांचा इतिहास समजून घेणे ही आज काळाची गरज आहे.

यावेळी लताबाई परीट ,मंगल परीट ,चांदाबाई परीट, विमल जाधव ,श्रीदेवी नलवडे ,राधिका परीट, मेगा कोळी, संगीता कोळी ,मनीषा परीट ,दीपिका यादव, लताबाई तानाजी परीट ,अनिल सुतार, विठ्ठल मु कोळेकर, सचिन परीट, संतोष माने ,अनिल नवाळे ,नितीन कानडे ,शरद कोळी ,महालिंग कोळी ,हाबिब नाईकवाडे, प्रवीण कासार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here