पेंच व्याघ्र प्रकल्पात जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा…विविध कार्यक्रमांचे आयोजन…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये दिनांक 29 जुलै, 2021 रोजी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या सात वनपरिक्षेत्र मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाघाचे निसर्गातील महत्व याबाबत स्थानिक गावकरी यांच्यात जाणीव जागृती करणे,

पर्यावरणातील वाघाचे स्थान आणि भूमिका याबद्दल वन कर्मचारी तसेच स्थानिक लोक यांना माहिती पुरवणे, शेजारील गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश होता. जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून पेंच च्या महत्वाकांक्षी प्रकल्प “वन अध्यापक योजने” ची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली.

याअंतर्गत सिल्लारी गेट ते घोटी गाव दरम्यान सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले यावेळी पूर्व पेंच चे सर्व क्षेत्रीय कर्मचारी, सातपुडा फाउंडेशन आणि प्रथम फाउंडेशन चे कर्मचारी तसेच आसपास च्या गावातील निसर्ग मार्गदर्शक, जिप्सी चालक आणि ग्रामस्थ यांनी हिरिरीने भाग घेतला. घोटी (मोठी) येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन समिती च्या माध्यमातून चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ग्रामस्थांनी घोटी गावात वृक्षारोपण आणि स्वच्छता कार्यक्रम राबविला. दुपारच्या सत्रात क्षेत्रीय कर्मचारी यांच्यात व्याघ्र संवर्धन आणि संरक्षण च्या तांत्रिक माहितीच्या प्रसारासाठी ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले.

यामध्ये सहा. वन सरंक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अर्थात NTCA मार्फत जारी करण्यात आलेल्या विविध प्रमाणभूत प्रचलित कार्यपद्धती (SOP) बाबत विस्तृत सादरीकरण केले.

सर्व कार्यक्रमांचे आयोजन पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, डॉ. रविकिरण गोवेकर व उपसंचालक डॉ.प्रभुनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनात अतुल देवकर, सहाय्यक वन सरंक्षक यांनी केले तसेच सर्व वन परिक्षेत्र अधिकारी व इतर वन कर्मचारी यांनी क्षेत्रीय स्तरावर कार्यक्रम पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here