मनसर येथे बायोगॅस करिता कार्यशाळा…

रामटेक – राजू कापसे

ग्राम पंचायत मनसर येथे युवा रूरल असोसिएशन तर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचे बायोगॅस बनविण्याकरिता नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कोविड महामारी व वाढत्या महागाईमुळे प्रत्येक नागरिक हवालदिल झालेला आहे.

स्वयंपाकाला इंधन म्हणून एल पी जी महागाईमुळे गरीब नागरिकांना परवडन्यायोग्य नाही तर वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने चुलीवर स्वयंपाक करणं हानिकारक असल्याचे युवा रूरल असोसिएशनचे प्रकल्प जिल्हा समन्वयक श्री नावेद खान यांनी सदर कार्यशाळेत सांगितले.सदर कार्यशाळेत मनसर गावातील व परिसरातील असंख्य लाभार्थी उपस्थित होते,सर्व उपस्थितांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बायोगॅस बाबत तालुका समन्वयक भगत यांनी विशेष मार्गदर्शन केले.

त्यावेळी सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांद्रे ,ग्राम पंचायत सदस्या सिमा गजबेस, संगीता पंधराम, प्रा हेमराज चोखांद्रे,दिनेश पंधराम ग्राम विकास अधिकारी श्री जीवनलाल देशमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here