तारापुर येथील बजाज हेल्थकेयर लि.कंपनी मध्ये १३ एप्रिल रोजी झालेल्या आपघातातील कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यु…

मालका वर्ती कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

पालघर – विनायक पवार

बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये बजाज हेल्थकेयर कंपनित दि.१३,रोजी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास रियेक्टर जवळ आचानक आग लागल्याने कंपनीतील एक कामगार गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाला होता.

या दुर्घटनेत निलेश बोरसे,२८हा 90 टक्के भाजला आसल्याने त्याच्या वर्ती नवी मुंबई येथील बर्न हॉस्पिटल मध्ये उपाचार सुरु होते मात्र डॉक्टराना नीलेश बोरसे हा गंभीर जख्मी झाल्याने त्याला वाचन्यात यश आले नाही बजाज हेल्थकेयर कंपनी मालका वर्ती कठोर कार्रवाई करून गुन्हा दाखल करून आटक करण्याची मागणी,

आता जोर धरत असून यापूर्वी ही याच कंपनीत ४ में २०१९ रोजी या कंपनीतील फॉस्परस ऑक्सीक्लोराईड या रसायनाचा व्यवस्थापणाच्या निष्काकजीपणामुळे झालेल्या दुर्घटनेत जवळपास ४६ कामगार त्यांचे डोळे गमावता वाचले होते.

बजाज हेल्थकेयर ही कंपनी प्रति रोज नव नवीन विषया साठी बोईसर तारापुर मध्ये प्रसिद्ध असून कंपनी प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण विभाग व औद्योगिक आरोग्य सुरक्षा संचालनालय विभागाकडून दिलेल्या सूचनांचे पालन न करता त्या सूचनांना केराची टोपली दाखवत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत असून या कंपनी मालका सह कंपनी प्रशासना वर्ती गुन्हे दाखल करण्याची मागणी समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here