भंडाऱ्यातील संरक्षण भिंतीवरील रिंग रोडचे काम मार्गी लागणार…खासदर सुनिल मेंढे यांच्या प्रयत्नांना यश…

भंडारा : शहराशेजारी असलेल्या गोसे खुर्द धरणाचा पूर परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून संरक्षण भिंतीवरील रिंग रोडचे प्रस्तावित काम अनेक वर्षापासून रखडलेले होते. त्या कामाला खा. सुनिल मेंढे यांनी सिंचन भवनात, कार्यकारी संचालक, विदर्भ इरीगेशन डेव्ह.कॉर्पो. (VIDC) यांची दि. १९ जून रोजी भेट घेतली व कामास गती मिळवून दिली.

त्यानुसार सां.बा. विभाग भंडारा व VIDC ह्यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण होणार असून त्यासाठी जून २०२० अखेरिस आवश्यक निधी सार्वजानिक बांधकाम विभागा ला देण्यात येईल अशी माहिती VIDC चे कार्यकारी संचालक श्री. शेख यांनी दिली.


आपल्या भागाचा विकास व्हावा, पर्यटनाला चालना मिळावी ह्यासाठी खा.मेंढे यांनी इंदिरा सागर जलाशय (गोसे डॅम) येथील पर्यटन विकासासाठीच्या आपल्या कल्पना कार्यकारी संचालकांच्या समोर मांडल्या. गोसे डॅम येथे सर्व सुविधा युक्त पर्यटन स्थळ व्हावे व तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्यासाठी पर्यटनासाठीच्या संसदीय समितीचा सदस्य ह्या नात्याने खा. मेंढे यांनी सदर पर्यटन स्थळासाठी निधी कमी पडू देणार नाही व त्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करण्याचा विश्वास खा. मेंढे यांनी दिला.


सिंचन भवनात झालेल्या आजच्या बैठकीत गोसी व शेळी उपसा सिंचन योजनेच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच पवनी उपसा सिंचन योजनेच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे पवनी भागातही सिंचनाची सोय होणार असल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले.


चौरास पट्टयात भूमिगत नदी पात्र आहे, त्याला होणारा भूजल पुरवठा गोसे च्या बांधकामा नंतर खंडित झालेला आहे. चौरास पट्ट्याचे पुनर्भरण करण्यासाठी त्वरित योजना करण्यासंबंधी चा उपयुक्त आणि व्यवहार्य पर्याय म्हणून धरणाच्या पायथ्या जवळून सोडले जाणारे डाव्या कालव्यातील पाणी वापरले जाईल व चौरास भागाचे पुनर्भरण करण्यात येईल त्यामुळे चौरास भागातील शेतकऱ्याचा जुने वैभव प्राप्त होईल.


तसेच गोसेचे परीघ ४०० किमी चे आहे. साधारण ८० ते १०० मीटर रुंदीचा भाग गोसे धरणाचा काठ म्हणून VIDC च्याा ताब्यात आहे. त्याठिकाणी बांबू किंवा तत्सम वनस्पती चे लागवड करून ते सर्व बायोमास, बायो इथेनॉल च्या कारखान्या करिता कच्चा माल म्हणून वापरता येईल. अशी उपयुक्त सूचना खासदार मेंढे यांच्या सोबत झालेल्या चर्चेत vidc चे कार्यकारी संचालक जे. एम. शेख यांनी केली.

यामुळे काठाचे वनीकरण होऊन काठ मजबूत होतील. पेट्रोलियम पदार्थ चा पर्याय मिळेल आणि तरुणांना रोजगार मिळेल. चर्चे वेळी माजी सिंचन आयोग सदस्य डॉ. उल्हास फडके, अधीक्षक अभियंता श्री. देसाई, कार्यकारी अभियंता श्री. कारेमोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here