रोजगार हमी योजनेच्या कामासाठी लाभार्थ्यांना हेलपाटे; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भरवश्यावर चालत आहे कारभार, पातूर पंचायत समितीमधील प्रकार…

पातूर – निशांत गवई

पातूर पंचायत समितीअंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामाचा गलथान कारभार सुरु असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. ग्रामिण भागातील लाभार्थ्यांना या योजनेसाठी पंचायत समितीचे उंबरठे झिझवावे लागत असल्याने अनेक लाभार्थी तक्रारीच्या पवित्र्यात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या रोजगार हमी योजनेच्या विभागा मार्फत विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थी पातूरच्या पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या विभागात भोंगळ कारभार सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेचा कारभार गेल्या अनेक दिवसापासून कंत्राटी परिचालक संतोष इंगळे या एका युवकांचे भरवश्यावर सुरु आहे.

तालुक्यातील जनतेला घरकुल, शेळी गोठा, कुक्कुटपालन, शौचालय, विहीर भरन, सिंचन विहीर आदी. कामे एका कंत्राटी परिचलकाच्या भरवश्यावर सुरु असल्याचे बोलले जात आहे.

या विभागात कार्यरत असलेले सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांना कामाचा अनुभव नसल्याने या कंत्राटी परिचलकाच्या भरवश्यावर हा कारभार सुरु असल्याने लाभार्थ्यांना हेलपाटे सहन करावे लागत असल्याचे बोलले जात आहे.या कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here