महिला बचत गटांकडून मायक्रो फायनान्स कडून होणारी सक्तीची वसुली बंद करण्यात यावी शंकर मावलगे यांची जिल्हाधिकारी इटनकर यांच्याकडे मागणी…

बिलोली – रत्नाकर जाधव

कोरोना व परतीच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आर्थिक अडचण निर्माण झाली आहे जिल्ह्यात बहुतांश महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स करून कर्ज उचलले आहे. या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिला बचत गटांकडे कर्ज वसुली सक्तीने केली जात आहे.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या हाताला काम नसल्यामुळे त्या आर्थिक अडचणीत आले आहे त्यामुळे त्यांच्याकडून सक्तीची वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष तथा बिलोली नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शंकर मावळे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉक्टर विटणकर यांच्याकडे केली आहे.

जर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिला बचत गट व त्यातील महिलांकडून कर्जाची सक्तीची वसुली केल्यास व यातून वसले ग्रस्त महिलेने जिवाचे काही बरे वाईट करुन घेतल्यास त्यात शासन जबाबदार राहील असा इशारा शंकर मावलगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबरोबरच पुढील सहा महिने मायक्रो फायनान्स कडून घेतलेले कर्ज मागण्यात येऊ नये व त्यानंतर केवळ कर्जाची मुदत हप्ते स्वरूपात वसूल करण्यात यावी अशी प्रमुख मागणी त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here