कोरोना काळात सेवा देणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या रणरागिनींचा महिला दिनानिमित्त सत्कार…

देण्यात आली एक दिवसाची सुट्टी ।।
मागील एक वर्षा पासून अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात सुरू आहे, मागील वर्षी 22 मार्च पासून संपूर्ण भारतात लॉक डाऊन लावण्यात आला, अकोल्यात सुद्धा कडक लॉक डाऊन ला सुरवात झाली, शहर वाहतूक शाखेवर रस्त्यावरील संचारबंदी प्रभावी पणे राबविण्याची जबाबदारी

असल्याने शहर वाहतूक शाखेचा एकूण एक कर्मचारी रस्त्यावर उभा राहिला अश्यातच वाहतूक शाखेच्या महिला अमलदारांवर मोठी जबाबदारी येऊन पडली, कुटुंब, लहान मुले, पती ह्यांच्या जबदरीसह स्वतः ला करोना पासून वाचविण्याचे मोठे आवाहन ह्या महिला वर्गा पुढे उभे होते,

परंतु घरी दुधपिते 6 महिने ते एक वर्षाची छोटी छोटी बालके घरी ठेवून ह्या महिला वर्गाने सेवा बजावली व सध्याचे कोरोनाचे पार्श्वभूमीवर सुद्धा शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार सेवा बजावीत आहेत, त्यांचे ह्या कार्याची दखल घेऊन 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शहर वाहतूक

शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला अमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना एक दिवसाची सुटी देऊन त्यांचे प्रति कृतज्ञाता व्यक्त केली, ह्या वेळी शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार नीता संके, दीपाली नारनवरे, पूजा दांडगे, वैशाली रणवीर, अश्विनी माने ह्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here