राष्ट्रवादी कॉंग्रेसची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे – महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर…

सांगली – ज्योती मोरे

येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जात असताना, आपली तयारी काय आहे? आपला अजेंडा काय आहे? आपली ध्येयधोरणे काय असतील? प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवणार आहोत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक संघटना म्हणून तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते उपक्रम राबवणार आहोत. याकडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

असे मत, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी, मिरज येथे आयोजित सांगली जिल्ह्यातील महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले आहे.दरम्यान यावेळी बोलताना राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले, जत, कवठेमंकाळ, आष्टा, इस्लामपूर, विटा अशा ठिकाणी महिलांसाठीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून, महिलांना एकत्र आणून,

आगामी निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या फळीची बांधणी करून, कार्यकारिणीतील महिलांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे.तरंच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल. स्वागत राष्ट्रवादी महिला आघाडी च्या प्रदेश सरचिटणीस छाया पाटील व प्रास्ताविक महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव यांनी केले तसेच राज्य महिला आयोगा च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रुपालीताई चाकणकर यांचा सत्कार सुश्मिता जाधव,

कमल पाटील अनिता पाटील , उज्वला पाटील जयमाला देशमुख , सुनीता देशमाने , गीता कोडग , नलिनी पवार , चंपाताई जाधव व वैशाली मोहिते यांनी राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव यांच्या सह जिल्ह्यातील दहा तालुक्याच्या अध्यक्षा व शहर अध्यक्षा यांनी आपल्या पक्षीय कामाचा आढावा मांडला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासो मुळीक , जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर दादा पाटील,यांच्यासह जिल्ह्यातील महिला तालुका अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सूत्रसंचालन इस्लामपूर महिला अध्यक्षा रोझा किणीकर यांनी केले व आभार साधना कांबळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here