राहुल मेस्त्री
गजबरवाडी तालुका निपाणी येथील एक महिला शेताकडे जात असताना अज्ञात दोन व्यक्तीने तिच्या गळ्यातील पाठीमागून येऊन मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असुन संशयित आरोपी म्हणून दोन अनोळखी व्यक्तींना कागल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 24 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गजबरवाडीहून सुळकुड तालुका कागल येथे असणाऱ्या आपल्या शेतीकडे जात असताना यावेळी दुचाकी स्प्लेंडर मोटारवरून काळापोषाख परिधान करून दोन व्यक्तींनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पोबारा केला.
सुमारे 45000 किमतीचे असणारे मंगळसूत्र घेऊन या अज्ञात चोरट्यांनी धूम ठोकली होती.सदर चोरटे सुळकुड गावाच्या दिशेने गेले आहेत असे सांगण्यात येत आहे.या महिलेने आरडाओरड केला पण तिथून चोरट्यांनी पळ काढला होता. यावेळी सदर महिलेने कागल पोलिस ठाण्यामध्ये धाव घेऊन घडल्या घटनेची माहिती दिली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अज्ञात दोन व्यक्तींना सध्या ताब्यात घेतले असून पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी यांच्या सह सहकारी करत आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अशा प्रकारची घटना घडल्यामुळे महिलावर्ग यांच्यासह नागरिकांच्यातुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.