माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात महिलेची धक्कादायक तक्रार…चित्रा वाघ यांनी प्रकरण केलं उघड…

न्यूज डेस्क – अगोदरच एका पिडीत मुलीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले शिवसेना आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचं दिसत आहे. मागील प्रकरण संपत नाही तोच पुन्हा दुसर प्रकरण समोर आलाय यामुळे संजय राठोड आता गोत्यात सापडले आहे. त्यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात धक्कादायक आरोप केला जात आहे.

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका महिलेने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत माझा लैंगिक छळ करतात असं ही त्यात म्हटलं आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील प्रकरणात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि राठोडांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर राज्य सरकारला राठोडांचा राजीनामा घ्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट सोशल मीडियावर याबाबत जाब विचारला आहे.

पोलिसांना याबाबत तक्रार करण्यात आली असली तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here