चतारीत किडनी आजाराने महिलेचा मृत्यू..!

दहा वर्षांत ३० किडनी ग्रस्तांचा मृत्यू. १०० च्या वर किडनी रूग्ण घेतात उपचार.

पातूर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील चतारी येथे किडनी आजाराने गेल्या दहा ते बारा वर्षापासून तांडव घातला असुन आता पर्यंत जवळपास ३० तेे ३२ किडनी ग्रस्त रुग्णांना मृत्यू ने कवटाळले आहे तर १०० पेक्षा अधिक नागरिक किडनी ग्रस्त आजाराचे उपचार घेत आहे.

यामुळे गावाला एक प्रकारचे ग्रहण लागले असुन दरवर्षीच किडनी आजाराने पछाडलेल्या रूग्णांना मृत्यू च्या कवेत जावे लागत आहे या प्रकारामुळे गावातील वातावरण भयभित झाले असुन प्रशासन सुद्धा हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे.

सन २००९ /१० पासुन चतारी गावात किडनी आजाराला सुरूवात झाली असुन या गावातील पिण्याच्या पाण्याची पातळी दरवर्षी घटत असल्याने या पाण्यातील क्षाराच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे.

यामुळे गावातील नागरीकांना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने क्षारयुक्त पाणी प्यावे लागत होते मात्र गेल्या वर्षी गावात जलशुद्धीकरण यंञ बसवले असल्याने गावातील काही भागात या यंञाच्या पाण्याचा पुरवठा केला जातो तरीसुद्धा गावातील किडनी आजाराच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे किडनी आजाराचे प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे.

या किडनी आजारामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त नवतरूणाचा बळी गेला आहे काही वर्षापासून किडनी आजाराचा उपचार घेत असलेल्या ७२ वर्षीय वत्सलाबाई बेलाप्पा डोंगरे यांचा गुरूवारी सकाळी ११वाजताच्या दरम्यान दोन्ही किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला यामुळे गावात हळहळ व्यक्त होत असुन त्यांच्या पश्चात पती,दोन मुले दोन मुली ,सुना नातवंडे असा आप्त परिवार आहे.

या दुखद घटनेमुळे संपुर्ण गावात भितीचे वातावरण निर्माण झालेआहे सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या किडनी ग्रस्त इसमाचा अंतविधी करतांना सोशल डिस्टसिंग चा वापर करून व सुरक्षित अंतर ठेवून अंतविधी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here