हंचिनाळ येथे सर्पदंश झालेल्या महिलेचा अखेर १९ दिवसांनी कोल्हापूरातील ईस्पितळात उपचारादरम्यान निधन…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

हंचिनाळ ता.निपाणी येथील पाटील मळ्यातील शेतात रोजगार करण्यासाठी गेले असता उसाचा पाला काढते वेळी सापाने पायाला दंश केल्यामुळे सौ रुपाली अम्रुत ढाले (वय 32) यांचे शुक्रवारी कोल्हापुरात खाजगी ईस्पितळात निधन झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी सौ रुपाली ढाले या रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या नेहमीप्रमाणे 21 जून रोजी येथील गावालगत असलेल्या पाटील मळ्यात येथील दादासो पाटील यांच्या शेतात उसाचा पाला (खुरपंन ) काढतं असताना कीचकाटात फरोड जातीच्या सापाने रूपाली यांच्या पायाला दंश केला. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केली.

त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी त्यांच्या जवळ जाऊन पाहिले असता साप दंश करून निघून गेल्याचे दिसले. पहिल्यांदा त्यांला बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील केंद्राने त्याठिकाणी व्यवस्था नसल्याचे सांगितल्यामुळे निपाणीच्या गांधी शासकीय ईस्पितळात हलविण्यात आले.

तिथे प्राथमिक उपचार करून त्यांला कोल्हापूरला शासकीय सीपीआर ईस्पितळात हलविण्यात आले. परंतु तिथे कोरोना पेशंटच्या गर्दीमुळे त्याची दखल न घेतल्यामुळे अखेर त्यांना कोल्हापूरातील खाजगी ईस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर 19 दिवस उपचार सुरू होते. सर्पदंशामुळे किडन्या निकामी झाल्यामुळे अखेर शुक्रवार 9 जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.

आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब हलाखीची असल्यामुळे रोजंदारी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबावर मोठा आर्थिक खर्च होऊनही रुग्ण दगावल्या मुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.त्यांच्या पश्चात पती. एक 14 वर्षांचा लहान मुलगा. 12 वर्षाची एक मुलगी,सासू,दीर जाऊ. असा परिवार आहे. एक शांत मनमिळावू प्रेमळ महिलेचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here