शेतीच्या मालकी हक्कावरुन महीलेस जबर मारहाण ! पोलीस कर्मचाऱ्यां विरुध्द गुन्हा दाखल…

पातुर – निशांत गवई

पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम खापरखेडा शेकापूर येथे शेतीच्या मालकी हक्कावरुन वाशीम येथे उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या बाबुसिंग रतन राठोड यांने व त्याचा कुटुंबातील सदस्यानी जबर मारहान केल्याची तक्रार करण्यात आली.सविस्तर माहीती अशी आहे की खापरखेडा येथील नितीन जाधव यांनी तिन महीण्या अगोदर ललीताबाबुसिंग राठोड यांना 53 आर शेती विकली होती.

परतु बाजुला शेती ही पण आमची आहे असा अट्टहास बाबुसींग यांनी धरला व आमच्याशी वाद घालणे सुरु केले माझ्या ताब्यातील 22 आर शेतीवर जबरदस्ती हक्क दाखवत होतो .या बाबत नितीन जाधव यांनी उपनिरीक्ष बाबुसींग राठोड यांच्या विरुध्द वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे 24 जुन ला रितसर तक्रार दीली. या तक्रारी मुळे बाबुसींग राठोड हा चिडला.

माझ्या मालकीच्या शेतात बाबुसींगचा मुलगा हा तणनाशक पंप घेऊन फवारणी करीत असता त्याला अडवीले असता सौ आशा नितीन जाधव हीस बाबुसींग राठोड यानी लोखंडी पाईपने जबर मारहात केली.

प्रशांतने लाथाभुक्याने मारहान केल्याची तक्रार सौ आशा जाधव यांनी तिन जुलै रोजी पातुर पोलीसला तक्रार दीली जाधव च्या तक्रारी वरुन पातुर पोलीस स्टेशनला भादवी 325,323,504’505,34 प्रमाणे बाबुसींग रतन राठोड, सौ ललीता बाबुसींग राठोड, प्रशांत बाबुसींग राठोड याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. बाबुसींग पवार हे वाशीम जिल्हात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याने पातुर पोलीस योग्य न्याय देत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here