गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या महिलेस अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई – एक लाखाचा ऐवज जप्त…

सांगली – ज्योती मोरे

गर्दीचा फायदा घेऊन चोरलेले दागिने विकण्यासाठी चाललेल्या नंदा सागर सकट, राहणार रामनगर कोल्हापूर रोड सांगली. या महिलेस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून दीड तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याचे मनी असलेले लहान मुलाचे मनगटी व दोन पिळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सांगली एसटी स्टँड मध्ये प्रवाशांचे दागिने चोरले असल्याचे या महिलेने कबूल केले आहे. याकामी हातकणंगले येथील आणखी एक महिलेचा सहभाग असून, तिच्याकडे उर्वरित दागिने असल्याचे तिने सांगितले आहे. पुढील तपास कामी सदर महिला व मुद्देमाल शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम, अपर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले,यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरिक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या निरिक्षणाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार,सुभाष सुर्यवंशी, मेघराज रुपनर,हेमंत ओमासे,चेतन महाजन,संदिप नलवडे,निलेश कदम, जितेंद्र जाधव,कुबेर खोत, सोहेल कार्तियानी,सुधीर गोरे,अरुण अवतखडे,शशिकांत जाधव,शुभांगी मुळीक,सुनिता शेजाळ, सचिन धोत्रे,दिपक गट्टे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here