विझच्या महसुलात ५० टक्क्यांची वाढ, कोविड प्रभावित बाजारात यावर्षी दुप्पट वाढ नोंदवली…

मुंबई – एफएमसीजी बाजारावरील आपला वरचष्मा सिद्ध करत ‘विझ’ हा वैयक्तिक निगा (पर्सनल केअर) आरोग्य रक्षण (हायजीन) क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड सर्वकालीन उच्चांक गाठत २०२१ ला निरोप देण्यासाठी सज्ज झाला आहे. महामारीच्या काळात या ब्रँडने महसुलात ५० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. इतकेच नव्हे तर कोविड पश्चात बाजारातही त्याची घोडदौड सुरू आहे. ही आकडेवारी मुळातच अत्यंत प्रभावी आहे.

कारण, महामारी येण्यापूर्वीच्या काळातही विझने महसुलात २५ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. आपला महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन व विकासदृष्टी कायम ठेवत विझ २०२३-२०२४ पर्यंत आपल्या महसुलात ४५ कोटी रुपयांची वाढ करण्याची आकांक्षा बाळगत आहे. ती सध्याच्या १५ कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे.

विझ केअरचे सहसंस्थापक श्रीयुत रितेश धिंगरा म्हणाले की, “संपूर्ण विझ परिवाराच्या अत्यंत सक्रिय, मजबूत आणि फलदायी कामगिरीच्या जोरावर कोविडच्या कहरातही आपण फीनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्यात यशस्वी ठरलो आहोत. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि बाजारपेठेतील बदलत्या हालचालींनुसार आपणही उत्क्रांत होत गेलो आहोत. त्याचा आपल्या एकूण यशात अत्यंत महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

महामारीनंतरच्या जगात विजयपथाकडे वाटचाल करताना आपल्याला नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागणारच आहे. मात्र त्याच्या यशस्वी मुकाबल्यासाठी आपण तयार आहोत. पुढील दोन वर्षांसाठी आपण अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये निर्धारित केली आहेत. आपल्या सर्वांच्या बळावर आपण ती सहजगत्या पूर्ण करू, असा विश्वासही वाटतो.”

पर्सनल केअर आणि हायजीन क्षेत्रात ग्राहकांच्या वेगाने बदलत्या मागण्यांची पूर्तता करत विझने नुकतेच अस्सल ऍव्हाँट गार्डे डिओड्रंट्सचा सेट लाँच केला आहे. तसेच आपल्या उत्पादनांच्या विस्तृत मालिकेत फोम हँडवॉशचीही भर घातली आहे. महामारी पश्चातच्या ग्राहकांच्या मागण्या विचारात घेता विझ २०२२ मध्ये कलर कॉस्मेटिक्स (रंगीत सौंदर्यप्रसाधने) आणि विविध हायजीन उत्पादनांच्या निर्मितीची पायाभरणी करत आहे. यासोबतच ग्राहकांचा सहभाग आणि त्यांच्या समाधानाचा अनुभव उंचावण्यासाठी ऑटोमेशनच्या प्रक्रियेकडे वाटचाल करत आहे.

आगामी तीन ते पाच वर्षांतील आपल्या अद्वितीय ब्रँड उभारणी प्रक्रियेसाठी विझने एक सविस्तर रूपरेषा तयार केली आहे. यात एक २० हजार चौरस फुटांचा सर्वस्वी नवीन आऊटलेट कारखान्याची उभारणी आणि एक १५ हजार चौरस फुटांच्या फुलफिलमेंट सेंटरचा समावेश आहे. यासोबतच विझ ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून रोजगार भरतीच्या प्रक्रियेला वेग देण्याची तयारी करत आहे. सद्य:स्थितीत पुरवठ्याच्या गरजा, सोशल मीडियावरील उपस्थिती, ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री आणि एकंदरीत मार्केटिंगसाठी विझची किमान १०० महिला कर्मचाऱ्यांच्या भरतीची योजना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here