पृथ्वीराज बावीकर यांच्या जाण्याने चर्मकार, ढोर आणि होलार समाजात पोकळी निर्माण झाली – बाबुराव माने…

होलार समाजातील जेष्ठ समाज सेवक कै.पृथ्वीराज बावीकर यांचे दि.18/03/2021 रोजी, त्यांचे वयाच्या 58 व्या वर्षी ह्रदयविकाराने निधन झाले. प्रसंगि बावीकर कुटुंबियांची सांत्वनपर रविवार दि.21/03/2021 रोजी,ठाणे जिल्हा-बदलापूर या ठिकाणी त्यांच्या रहात्याघरी भेट घेतली.

त्यावेळी पृथ्वीराज बावीकर यांच्या अचानक जाण्याने चर्मकार,ढोर आणि होलार समाजात पोकळी निर्माण झाली आहे असे चर्मकार ऐक्य परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव माने यांनी प्रतिपादन केले. पुढे माने यांनी म्हटले की,पृथ्वीराज बावीकर यांनी जे समाज हिताचेकार्य हाती घेतले होते.

ते बावीकर कुटुंबाने पुढे नेहावे.समाज तुमच्या सदैव पाठीशी आहे.यावेळी गुरू रविदास सामाजिक संघनेचे संस्थापक प्रकाश शिंदे,गुरू रविदास संघर्ष संघ,दिवा संस्थापक-अध्यक्ष सूर्यकांत कदम तर समाज सेवक राजेंद्र बाविस्कर,

अॅड.रमेश हंकारे तसेच राष्ट्रीय चर्मकार संघाचे अंधेरी तालुका अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड आणि संजय जविर,काका कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थितीत होते. या सर्वांनी पृथ्वीराज बावीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
(या प्रसंगाची काही क्षणचित्रं)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here