विलो मॅथर अँड प्लॅट पंप्स प्रा. ली.सामाजिक बांधिलकी:सांगली जिल्ह्यातील पुरबधित गावांना दिले ट्रॉली माऊंटेड पंम्स:रोटरी क्लबचा पुढाकार

कोल्हापूर: राजेंद्र ढाले

गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील  विलो मॅथर अँड प्लॅट पंप्स प्रा. ली. पुणे व कोल्हापूर या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीच्या वतीने  सामाजिक बांधिलकी उपक्रमातून सांगली जिल्ह्यातील पूर बांधीत गावातील पुनदी,बुर्ली, अंकलकोप, भिलवडी या ग्रामपंचायतीना आपत्ती जन्य परिस्थितीत पूरपरिस्थितीचा  सामना करण्यासाठी कंपनी उत्पादित असलेल्या  ट्रॉली माऊंटेड पंम्स महापुरात आपत्ती व्यवस्थापनासाठी बहाल करण्यात आले.

विलो एसईची  उपकंपनी असलेल्या विलो कंपनीकडून मिळालेल्या लाखो रुपये किमतीच्या या भेटवस्तू पाहून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी भारावून गेले.

कंपनीकडून नेहमीच कामगार व व्यवस्थापन यांच्या हिताबरोबर आजूबाजूच्या गावातील गरजा ओळखून सामाजिक बांधिलकी उपक्रमातून वेगवेगळ्या प्रकारची मदत दिली जाते.सांगली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावे महापुराच्या पाण्याने वेढली जातात.त्यामुळे अश्या गावासाठी सामाजिक बांधिलकी उपक्रमातून गावच्या  ग्रामपंचायतीकडे आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी 

ट्रॉली माऊंटेड पंम्सची गरज ओळखून  संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य  पदाधिकारी याच्या कडे ही उपकरणे प्रदान करण्यात आली. गावच्या आपत्यकालीन परिस्थितीत  लोकांना व गावाला त्याचा  फायदा होणार असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त  केले.

 कंपनीकडून देण्यात आलेले   ट्रॉली माउंटेड पंम्स हे गावातील पूरपरिस्थितीत उपयुक्त ठरणार आहेत. महापुरात आलेला केरकचरा,प्लास्टिक व गाव गल्लीत साचून राहिलेले पाणी उपसा करण्यास मदत ठरणार आहे.तसेच पुराचे पाणी उपसा करून आपत्ती जन्य परिस्थितीत आसपासच्या गावानाही त्याचा उपयोग होणार आहे. डिझेलवर चालणारी ही यंत्रणा ढकलुन नेहता येते.जिथं जिथं पूरपरिस्थिती आहे. तिथं या मशीनचा उपयोग होणार आहे.

 सदर कार्यक्रमास कंपनीचे चेअरमन व  मॅनेजिंग डायरेकटर  श्री .हेमंत वाटवे,व्हीपी फायनान्स  श्री.श्रीकांत शिरोडकर,श्री.अनिल केसवाणी,श्री अजित इंगळे,श्री राजेश उंडे,श्री विनोद पवार,प्लांट हेड श्री. मिलिंद खरे,श्री. मुकुल पेंडसे,श्री. अंशुमन बडे,तसेच रोटरी क्लब सांगलीचे पदाधिकारी, संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,एचआर मॅनेजर  संदीप सावंत ,कंपनी व्यवस्थापन ,कामगार संघटनेचे अध्यक्ष, याची उपस्थिती होती.

फोटो ओळ:विलो मॅथर अँड प्लॅट पंप्स प्रा. ली.सामाजिक बांधिलकी उपक्रमातून सांगली जिल्ह्यातील पुरबधित गावांना दिले ट्रॉली माऊंटेड पंम्स देण्यात आले यावेळी कंपनी व्यवस्थापन व रोटरी क्लब पदाधिकारी व गावकरी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here