आता तरी देवा मला पावशील का.? फेम प्रसिद्ध लोककवी हरेंद्र जाधव काळाच्या पडद्याआड…

आता तरी देवा मला पावशील काय,तूच सुख कर्ता ,तुच दुःख हर्ता, ऐका सत्यनारायणाची कथा अशी जवळपास १०हजार अजरामर गाणी /कथा काव्य लिहून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेले लेखनाची आणि समाजकारणाची आवड असलेले प्रसिद्धलोककवी हरेन्द्र हिरामण जाधव यांचे त्यांच्या राहत्या घरी सानपाडा मधील निवारा सोसा.

सेक्टर.३ येथे वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. नाशिक.मधील मिग-ओझर हे मूळ गाव असलेल्या हरेन्द्र हिरामण जाधव यांचा जन्म १६ फेब्रु १९३३ ला एका गरीब कुटुंबात झाला होता.१९४७ साली सातवी पास झाल्यानंतर पुढे शिक्षण घेत असताना ही गीत लेखनाची आवड निर्माण झाली अन पुढे ती ध्येयात परावर्तीत झाली.

गाण्याच्या जलश्यासाठी पुढे १९५८ साली मुंबईला आल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला पण गाण्याच वेड मात्र कायम होते. हळू हळू ह्या जलश्याचे रुपांतर कव्वाली मध्ये होत गेले. घाटकोपर येथे त्यांनी किसन खरात आणि लोककवी हरेंद्र जाधव अशी कव्वाली पार्टी निर्माण केली.त्यांचा पहिलाच सामना प्रल्हाद शिंदे यांच्या सोबत बोरीबंदर येथे झाला.

आंबेडकरी चळवळीत अनेक गुणी लोककलाकार निर्माण झाले त्यापैकीच एक कवी म्हणजे आयु. लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव हे होत.मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यात ३३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होते , पुढे मुख्यध्यापक ह्या पदावरून १९९२ साली निवृत्त झाले.गीत भीमायन,गीत रमायन,संसार माझा आंबेडकरी हे

काव्यग्रंथ प्रसिद्ध आहे.अंधश्रद्धा निर्मूलन, एडस, दारूबंदी या विषयावरील अनेक सामाजिक प्रबोधनात्मक लोकनाट्य, पोवाडे आणि कार्यक्रम आकाशवाणी व दूरदर्शन प्रसारित झाले आहेत.

सहाशे हुन अधिक ध्वनिफिती लोकार्पित आहेत.भीमगीत, सामाजिक गीत, लोकगीत, भजन, गझल, कविता, बालगीत, कोळीगीत, अभंग,गण-गवळण, लावण्या, पोवाडे, लोकनाट्य.या सर्व क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करीत या लोककवीने वयाच्या ८८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.लोककवी हरेंद्र जाधव यांना महाव्हाइस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here