कांग्रेस चा पालघर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यक की आदिवासी समाजातील होणार?

पालघर – भरत दुष्यंत जगताप

अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदी मुस्लिम समाजातील व्यक्तीची निवड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कै.चंद्रकांत(नन्नू ) दुबे ही या पदासाठी प्रबळ दावेदार होते,परंतु कोरोना मुळे त्यांचे अकाली दुःखद निधन झाल्यामुळे ते या स्पर्धेतून आपोआप बाहेर झाले.

पालघर मधील स्वातंत्र्य चळवळीत असंख्य मुस्लिमांचा सहभाग होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस चा जिल्हाध्यक्ष होण्याचा मान अजूनही मुस्लिम समाजाला मिळालेला नाही.ही खंत समाजात आहेच.आज पालघर काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये ३ प्रमुख नेते आहेत.त्यामध्ये रुफि भुरे,मोईज शेख,सिकंदर शेख ही नावे सामील आहेत.

ही सर्व मंडळी सुशिक्षित आहेत.राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात चांगला दांडगा अनुभव आहे व काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी सुद्धा तिघांचे सलोख्याचे संबंध आहेत.तसेच पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असुन ‘पेसा’कायदा’ ही जिल्ह्यात लागू आहे.

त्यामुळे जऱ कांग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांना आदिवासी समाजातील अध्यक्ष निवडावा लागला तर त्या साठी जिल्हा कार्यध्यक्ष मधुकर चौधरी आणि आदिवासी समाजाचे एक उभरते नेतृत्व बलवंत गावित हे आघाडीवर असल्याचे बोलले जाते।

अश्या परिस्थतीत अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची काँग्रेस वर्तुळात चर्चा रंगली आहे.सत्ता नसताना व सत्ता असताना मुस्लिम आणि आदिवासी समाज काँग्रेसच्या पाठी नेहमी खंबीर पणे उभा राहिला आहे व वेळोवेळी आपल्या एकनिष्ठ पणाचे दर्शन प्रत्येक निवडणुकीत दाखवले आहे.

काँग्रेस जातीपातीचे राजकारण करत नाही पण त्याच वेळी दीर्घ काळ एखाद्या समाजावर अन्याय ही करत नाही,त्यामुळे मुस्लिम व आदिवासी समाज बांधवांना एक चालून ही आलेली संधी ते आता कश्या प्रकारे हाताळतात यावर पुढचे सर्व गणित अवलंबून आहे.

केदार काळे हे एक वर्षा पूर्वी राजीनामा देऊन शिवसेनेत दाखल झाल्यामुळे जिल्हा अध्यक्षपदी दिवाकर पाटील हे अध्यक्ष झालेआणि त्यांच्य्या नेतृत्वात झालेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिति निवडणुकीत कांग्रेसला फक्त एक जिल्हा परिषद सीट वर समाधान मानावे लागले.

तसेच कांग्रेस पक्ष मागील एक वर्षापासून नवनियुक्त अध्यक्ष दिवाकर पाटील यांच्या नेतृत्वात वरिष्ठांच्या विश्वासाप्रमाणे पाहिजेत तेव्हढी भरीव प्रगति करू शकला नाही,त्यामुळे वरिष्ठ पातळीवर दिवाकर पाटील यांच्यावर नाराजी चे स्वर उमटत आहेत.

पालघर जिल्हा काँग्रेस मध्ये बदल होणे हा निश्चित भाग असून प्रामाणिक काम करणारा सच्चा कार्यकर्ता पुढे यावा व पालघर जिल्हा काँग्रेसची धुरा खांद्यावर घेवून आता पासूनच २०२४ च्या निवडणुकी चे नेतृत्व या पांच नेत्यांपैकी एकाच्या हाती सोपवावे असे मत अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या वृत्त प्रतिनिधीला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here