वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे खवले मांजर रेस्क्यू…

Courtesy - Karan kothekar

रामटेक – राजु कापसे

रामटेक जवळील गवळण नाल्याजवळील अंगणात सापळले खवाल्या मांजर, रामटेक जवळील गवळण नाला येथील शुभम मोहोभिया यांच्या अंगणात विचित्र जातीचा प्राणी आढळून आला.

त्वरीत शुभम यांनी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे सदस्य मंथन सारभाऊ यांना कॉल केला व यांचा घरात एक प्राणी असल्याची माहिती दिली मंथन सारभाऊ यांनी त्वरित संस्थेचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांना माहिती देली सोबत सचिव अजय मेहरकुडे यांना घेऊन संकेत स्थळावर पोहोचले व तिथे त्यांना खवल्या मांजर (प्यांगोलीयन) असल्याचे लक्षात आले, खवल्या मांजर चा सुखरूप रेस्क्यू करून त्याला त्वरित रेंज ऑफिस रामटेक मध्ये ठेवण्यात आले.

रामटेक चे RFO श्री शेंडे साहेब , RO अगडे साहेब , वनरक्षक पंकज कारामोरे सह वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेशन चे सदस्य यांनी रामटेक खुमारी खंड क्र.258 येथे मानसींगदेव अभियारण्याजवड सुखरूप सोडण्यात आले.

Courtesy – Karan kothekar

वन्यजीव अभ्यासक श्री पराग दांडगे व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेश चे अध्यक्ष राहुल बबनराव कोठेकर यांचा माहिती नुसार खवले मांजर हा जगातील सगळ्यात जास्त शिकार आणि तस्करी होणारा, मांजार कुळातील प्राणी आहे, सर्वसामान्य लोकांना या प्राण्याबद्दल फार थोडी माहिती असते, विदर्भातही या प्राण्यांची अवैध शिकार तसेच तस्करी सुरू असून वन्यजीव विभागाने या प्राण्याच्या सनवर्धनासाठी action plan तयार करण्याची गरज आहे.

मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, छत्तीगड हे खवल्या मांजर शिकारीचे प्रमुख केंद्र असून तस्करीचे धागेदोरे चीन पर्यंत आहेत। विविध प्रकारच्या अंधश्रद्धा या प्राण्याबद्दलच्या असून तस्करीचे प्रमुख कारण त्यांच्या खवलयांचा चायनीज औषधी मधला वापर आहे. आपल्या कडे त्याच मांस खाण्यासाठी पण शिकार केली जाते.रामटेक तालूक्यात पहिंल्यादाच खवल्या मांजरला पाहण्यात आल्याचे वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेश चे सदस्य यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here