पत्नीचे धक्कादायक पाउल…प्रियकरासोबत गळफास घेत संपवली जिवनयात्रा…

न्यूज डेस्क – विवाहबाह्य संबध असणाऱ्या असणाऱ्या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत गळफास घेतल्याची घटना औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात घडली. नवरा घराबाहेर जाताच घरात आलेल्या प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

मृत विवाहीतीचे नाव सीमा ईश्वर कांबळे (वय- ३५) आणि सचिन गंगाधर पेटारे (वय- २७) असून यांचे बरेच दिवसांपासून प्रेम संबध होते. मयत सिमाचा पती ईश्वर हा गॅस एजन्सीत कामाला होते तर प्रियकर सचिन प्लंबर होता. ईश्वर आणि सचिन यांची तोंड ओळख होती. त्या माध्यमातून सिमा व सचिन यांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर सहवासात व नंतर प्रेमात झाले.

सचिन हा देखील विवाहीत होता. त्याच्या पत्नीला पती सचिनचे प्रेमसंबंध माहिती नव्हते असे म्हटले जात आहे. सचिनच्या परिवारातील सदस्यांनी त्याला सिमासोबतचे प्रेमसंबंध थांबवण्यास सांगितले होते. मात्र सचिनने ऐकले नव्हते.

घटनेच्या वेळी सिमाचा पती ईश्वर कामावर गेला होता आणि मुले खेळण्यासाठी बाहेर गेली होती. दरम्यान सचिन तिच्याजवळ आला आणि दोघांनी एकाच साडीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. मुले खेळून घरी परत आली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे परिसरातील लोकांसह नातेवाईकांना खरा प्रकार लक्षात आला. या प्रकरणात पोलिसांना माहिती देण्यात आली असून घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here