बेळगाव जिल्ह्यातील हंचिनाळ मध्ये धक्कादायक प्रकार…चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने काढला पतीचा काटा…

राहुल मेस्त्री

बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील हंचिनाळ गावामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीचा काटा काढला आहे. अधिक माहिती अशी की मयत व्यक्ती सचिन सदाशिव भोपळे वय 45 रा.गडहिंग्लज व अनिता सदाशिव भोपळे हे दोघे पती पत्नी असुन सचिन भोपळे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरुन वारंवार भाडण होत होते.

हे भांडण मिटवण्यासाठी अनिताचा भाऊ कृष्णात घाटगे याने या दोघांना आपल्या गावी हंचिनाळ ता.निपाणी येथील शेत घरात बुधवार दि.2 रोजी बोलविले..दि.3 सप्टेंबरच्या पहाटे भांडण मिटवता मिटवता यांच्या मध्ये वाद निर्माण झाला.

यात पत्नी अनिताने पती सचिनच्या डोक्यात वार केला व आपले भाऊ बहिण कृष्णात घाटगे,गणेश रेडेकर व वनिता यांच्या मदतीने सचिनचा गळा दाबून जिव घेतला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबी भाड्याने आणून म्हैसीचे पिल्लू पुरायचे आहे असे सांगून त्याला बोलवण्यात आले.जेसीबीने खड्डा काढून झाल्यानंतर चहा घेण्यासाठी जाऊ असे सांगून जेसीबी चालकाला घरी आणले.. व सदर मृतदेह त्या खड्ड्यात टाकून त्यावर थोडीफार माती टाकली.

जेसीबी चालक खड्डा मुजवण्यासाठी आल्यानंतर त्याला इथे काहीतरी चुकीचे घडले आहे.. अशी शंका आली खड्डा मुजवुन झाल्यानंतर जेसीबी चालकाने घडला प्रकार हंचिनाळ गावातील एकाला सांगितला व या दोघांनी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत कोगनोळी ता.निपाणी येथील उप पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस उपनिरीक्षक बीएस तळवार यांना घडलेला प्रकार सांगितला.

त्यांनी ही माहिती वरिष्ठांना सांगून दिनांक पाच सप्टेंबर रोजी घटनास्थळी जाऊन मृतदेह खोदण्याचे काम सुरू केले. यामध्ये मृतदेह सचिन सदाशिव भोपाळे याचा आढळून आला सदर मृतदेहाचा पंचनामा करून.. शवविच्छेदन बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सलीम मुजावर यांनी केले यावेळी प्रांताधिकारी युकेशकुमार, प्रशिक्षण एसपी दिपन एम.एन., तहशिलदार प्रकाश गायकवाड, डीवायएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय संतोष सत्यनाईक, एएसआय टोलगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here