वर्ग मित्रांची पत्नी सरपंच झाल्या म्हणून केला भव्य सत्कार…

गोपाल विरघट – दानापूर

कुटुंबाचे अनेक प्रकार ऑफिस कुटुंब, ऑफिस स्टॉप कुटुंब, पत्रकार कुटुंब, असच एक प्रेमाचं प्रतीक असलेलं मैत्रीचं कुटूंब. अश्याच एका मित्र कुटुंबातील सदस्यांची पत्नी सरपंच पदी विराजमान झाल्या म्हणून वर्ग मित्रांनी त्यांचा जाहीर सत्कार केला.

तेल्हारा तालुक्यातील क्रमांक 2 ची ग्रामपंचायत म्हणून दानापूर गावाकडे पाहिले जाते येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून वर्ग मित्र धम्मपाल बाळकृष्ण वाकोडे यांच्या पत्नी सौ, सपना धम्मपाल वाकोडे या सरपंच म्हणून विराजमान झाल्या यांचा अभिमान म्हणून आज त्यांचा वर्गमित्र परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी कोणी सदन शेतकरी, ऑटो मोबाईल व्यापारी ,सैनिक, अडत व्यापारी ,भाजीपाला उत्पादक ,पत्रकार अश्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांनी आपले योगदान देत त्यांचा सत्कार केला.व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यामध्ये भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सुरेश येऊल , अंकिता येऊल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच सौ. सपना धम्मपाल वाकोडे व यांच्या सपत्निक सत्कार यावेळी घेण्यात आला.

यावेळी सरपंच यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी या कार्यक्रमाला सरपंच ,सौ, सपना वाकोडे, प्रतिभा घायल, छाया वाघमारे, पल्लवी विखे, प्रियंका सिसोदिया,हर्षा विखे, अंकिता येऊल, अंकिता ढाकरे, पुनम दांदळे,गणेश ढगे, संदीप धुरडे,रामकिशोर घायल, गजानन वाघमारे ,महेंद्र विखे,अमोल सिसोदिया,

महेश विखे, गणेश ढाकरे, राहुल दांदळे , अनिल खोडे, मोहन येऊल, योगेश नाठे, प्रमोद येऊल, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिलकुमार धुरडे यांनी केले तर आभार प्रमोद येऊल यांनी मानले.तबल 17 वर्षांनी एकत्र आले वर्ग मित्र शालेय जीवनात खेळ, मस्ती,

शालेय जीवनाचा आनंद काही वेगळाच असतो जस, जस वय व जबाबदाऱ्या आल्यावर हे सगळं विसरल्या जात. मात्र तब्बल 17 वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रांनी तोच धीगांना, मौज मजा केली .आपल्या पत्नी व मुलांच्या सहवासात आनंदात दिवस घालवल्याचे यावेळी सुनिलकुमार धुरडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here