देवलापार जवळील बांद्रा शिवारात बोलोरो बाईकचा धडकेत पत्नीचा मृत्यू तर पती जखमी…

रामटेक – राजु कापसे

देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येण्यारा बांद्रा शिवारात एका सडक दुर्घटनेत मागून येण्यारा बोलोरो गाडीने एका मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वर बसलेल्या पत्नीचा खाली पडून मृत्यू तर पती जखमी झला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरनिवासी गौरीशंकर शरणागत वय 55वर्ष व पत्नी मालन शरणागत वय 50 सोबत बाईक कर mh 31 Ex 0464 ने कुरई वरून नागपूरकडे येत होता.

या दरम्यान मागून येण्यारा बोलोरो गाडी कर mp 50 bc 0224 चाचकलाने गाडी भरदाव चालवत मोटर सायकलला मागून धडक दिली यात मोटरसायकल वर बसलेली पत्नी खाली पडून जबर जखमी झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला तर पती गौरीशंकर जखमी झाला.

आरोपी चालक घटनेनंतर वाहन घेऊन पळून गेला आरीपी वाहन चालका विरोध देवलापार पोलीस स्टेशन येथे भादावी कलम 279,337,304 अ नुसार गुन्हा नोंदविला गेला असून वाहनाचालकाचा शोध घेत आहे पुढील तपास केशव पूजरवाढ पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here