पत्नीने पतीला जिवंत जाळले…कारण ऐकून थक्क व्हाल…

न्यूज डेस्क – उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. असा आरोप केला जात आहे की एका पत्नीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. पहाडपूर गावात एका 25 वर्षीय तरूणाला पत्नीने प्रियकराच्या मदतीने जिवंत जाळले. रविवारी उपचारादरम्यान विवाहित तरुण अमित कुमार यांचा मृत्यू झाला. अमितच्या वडिलांनी सून व तिच्या वडिलांसह अन्य तीन लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अमितचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. अमितचे वडील सुरेश चंद यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा सुनेचा स्थानिक रहिवासी राकेशशी संबंध आहे.

ते म्हणाले, “अमितचा मित्र हेमंत जो राकेशचा मित्र देखील आहे, त्याने शनिवारी अमितला फोन करून जवळच्या वीटभट्टीला बोलावले. नंतर अमित बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. तो गंभीरपणे जळाला होता.”

त्याने दावा केला आहे की त्यांची सून संगीता यांनी हेमंत आणि राकेश यांच्यासह अमितला बांधले आणि अंगावर डिझेल ओतून त्याला पेटवून दिले. ते म्हणाले, माझ्या मुलाच्या हत्येमध्ये संगीताचे वडील राम स्वरूपही सामील आहेत.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आदित्य वर्मा यांनी सांगितले की, अमितच्या वडिलांकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे संगीता, हेमंत जाटव, राकेश आणि राम स्वरूप यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेशला अटक करण्यात आली असून बाकीच्यांनाही अटक केली जाईल. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here