लुगडी, धोतर वाटप करून केला प्रजासत्ताक व जन्मदिवस साजरा
प्रजासत्ताक दिनासह जन्मदिवसाचे औचित्य…जि.प. सदस्य हरीष उईके यांचा अभिनव उपक्रम
राजु कापसे
रामटेक
आदीवासीबहुल भागातील बोथिया पालोरा येथील जि.प. शाळा तथा कनिष्ट महाविद्यालय येथे २६ जानेवारीला सकाळ ८ वाजता प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष श्री. हरीष उईके यांनी ध्वजारोहन करून मानवंदना दिली. यावेळी उपस्थित पाहुण्यांमध्ये श्री. मेश्राम, श्री. लांजेवार, श्री. आर.एम. कंगाले, श्री. गुड्डु भलावी, श्री. राम कुमरे आदी. उपस्थित होते.
विशेष म्हणजे नेमका याच दिवशी जि.प. सदस्य हरीष उईके यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी या अनुषंगाने परीसरातील विधवा व गरजु तसेच वृद्ध महिला – पुरुषांना लुगडी व धोतर चे वाटप करून प्रजासत्ताक दिनासह आपला जन्मदिवस साजरा केला. यावेळी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री हरिभाऊ जी मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री अरूनजी लांजेवार, श्री आर.एम. कंगाले माजी सैनिक ,रामजी कुमरे ,गुड्डू भरावी, दुर्योधन ईनवाते, मंगेश , श्रीराम कुमरे, रेखाबाई वाडीवे, दशवंतीबाई टेकाम, दशवंती भलावी, रजवतीबाई आतराम, बयाबाई भलावी, झेलाबाई मरकाम, सुमित्राबाई भलावी, निर्मलाबाई मलघाम, शिलाबाई कुंभरे, श्री. तुकाराम वरठी, श्री. बालक कुमरे, सुकीबाई कुमरे, कमलाबाई मरकाम, सिताबाई मरकाम, गिरीजाबाई कुंभरे, हिलवंती भलावी, समुद्राबाई कुंभरे, अनिताबाई भलावी, विजोबाई टेकाम, निर्मलाबाई भलावी आदी. उपस्थित होते.