डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर बुलढाणा येथे गावठी दारूची सर्रास विक्री…

फाईल फोटो

बुलढाणा:- राहुल गवई

बुलढाणा जिल्हा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील नगरपालिका ची शाळा ही दारू विक्री करणाऱ्याचा अड्डाच बनलीय.या इमारतीच्या खोली मध्ये च यांच्या दारू चे ड्रम ठेवले आहेत तसेच यांच्या भट्ट्या सुद्धा याच ठिकाणी सुरू आहे.

त्या मुळे या ते सडवा व त्यातील घाण ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परीसरात येऊन ठेपली आहे.त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या त्रास होत आहे.

दारू पीणारांची वर्दळ जास्त प्रमाणात असते.त्यामुळे महिला ना घ्या बाहेर पडावं की नाही हा प्रश्न आहे.या सर्व जाचाला कंटाळून आगोदर या नगरातील नागरिकांना हि माहिती बीट जमादार यांना दिली होती . परंतु हे थातुरमातुर कारवाई करुन निघून जातात.

या सर्व प्रकाराची तक्रार मा.जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्याल, बुलढाणा यांच्या सेवेसी दिलं आहे.जर का डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील दारू बंद नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here