का पूजा करतात वटपौर्णिमेच्या दिवशी..?

आपल्या पतीही दिर्घायुषी आयुष मिळावे याकरिता सण साजरा केला जातो…

दानापुर – गोपाल विरघट

औषधी गुणसंपन्न असल्याने वडाच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच त्याला ‘वटवृक्ष’ असे सुद्धा संबोधले जाते. वटसावित्रीच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून झाडाच्या सभोवताली धागा गुंडाळतात. यातून वटवृक्षाच्या संवर्धनाचा संदेश तर मिळताे शिवाय पारंपरिक रीतिरिवाज जाेपासला जाऊन औषधी गुणधर्म असलेल्या झाडाचे संवर्धन हाेते. त्यामुळेच वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.”मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य आणि मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे”,

या दिवशी वृक्षाची पूजा करतात. वडाला फुले, वाण, पाणी देत त्याभोवती परिक्रमा करावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते. त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते. वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षांसाठी जगते त्याचप्रमाणे आपला पतीही दिर्घायुषी व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवल्यास ते वाचते असाही समज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here