Garena Free Fire प्ले स्टोअरवरून का गायब झाले..?

न्युज डेस्क – भारतातील Google Play Store आणि Apple Store मधून लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Garena Free Fire गायब आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, भारत सरकारने 54 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत फ्री फायर गेमचा देखील प्रतिबंधित चायनीज अ‍ॅप्सच्या यादीत समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फ्री फायर गेम गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही, तरीही तुम्ही फ्री फायर मॅक्स नक्कीच डाउनलोड करू शकता. दुसरीकडे Apple App Store बद्दल बोलायचे झाले तर Garena Free Fire आणि Garena Free Fire Max दोन्ही तेथून काढून टाकण्यात आले आहेत.भारतात PUBG मोबाईलवर बंदी घातल्यानंतर, या बॅटल रॉयल गेमला खूप लोकप्रियता मिळाली आणि मोठ्या संख्येने वापरकर्ते Garena फ्री फायर गेम खेळू लागले. तथापि, सध्या कंपनीने ते गायब होण्याच्या कारणाबद्दल कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.

देशात पुन्हा ५४ चीनी अ‍ॅप्सवर बंदी…आतापर्यंत ३०० हून अधिक अ‍ॅप्सवर बंदी…वाचा यादी…

फ्री फायर हा चिनी मोबाईल गेम आहे असे बहुतेक लोक म्हणतात. तथापि, कंपनीच्या प्रोफाइलमध्ये असे काहीही सिद्ध होत नाही. Garena ची मूळ कंपनी Sea Ltd चे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. कंपनीच्या ऑनर फॉरेस्ट लीचा जन्म चीनमध्ये झाला असला तरी, जो आता सिंगापूरमध्ये राहतो.

सरकारने सांगितले आहे की 2020 सालापासून बंदी घातलेले चिनी अॅप नाव बदलून भारतात आले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “Tencent आणि Alibaba च्या अनेक अ‍ॅप्सनी मालकी लपवण्यासाठी त्यांचे स्वरूप बदलले होते. ते हाँगकाँग किंवा सिंगापूर सारख्या देशांमधून देखील होस्ट केले जात होते, परंतु शेवटी डेटा चीनी सर्व्हरवर जात होता. अ‍ॅप्सना सुविधा मिळत होती. एपीके फाइल्स सारख्या माध्यमांतून डाउनलोड करा आणि सरकारने त्याची दखल घेतली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here