ब्रम्हापुरी नगर परिषद स्वच्छतेकडे का दुर्लक्ष करतो..?

चंद्रपुर – रितेश देशमुख

ब्रह्मपुरी नगर परिषद ला स्वच्छ सर्वे अंतर्गत थ्री स्टार नामांकन प्राप्त झाले यात मोलाचे कार्य ब्रह्मपुरी तील सर्व नागरिकांनी तसेच ब्रम्हापुरी नगर परिषद मधील कंत्राट कामावर असलेल्या साफ-सफाई कर्मचारी यांना मुख्यत्वे जातो.ब्रह्मपुरी नगर साफ, स्वच्छ असावी याकरिता ब्रह्मपुरी करांचे प्रामाणिक प्रयत्न असते. त्याप्रमाणे ब्रह्मपुरी येथील नागरिक प्रयत्न करत असतात.

मात्र स्वच्छतेच्या दृष्टीने तशा सुविधा निर्माण करून देणे हे नगरपरिषदेचा कर्तव्यच आहे.मात्र कोणत्याही सुविधा तयार न करता एखाद्या व्यक्तीकडून स्वच्छतेबाबत अपेक्षा करणे हे चुकीचे ठरते.टिळक नगर, समता कॉलनी, वाल्मिक नगर येथून जाणाऱ्या मुख्य हायवे रोडला लागून ठेंगरी साऊंड सर्विस व एक कबाडी दुकान जवळून गेले असता या मुख्य हायवे रोडवर लोकांच्या वापरातील संडास बाथरूम व धुणीभांडी करायचा पाणी या रोड वरून सतत वाहत असतो.

आणि यामुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना ह्या घाणेरड्या पाण्यावरून आवागमन करावा लागतो.हे त्या भागातील राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे.त्यामुळे नगर परिषदेने फक्त पुरस्कारच घेत राहायचे की लोकांच्या आरोग्य आणि सुविधा याबाबत सुद्धा प्रयत्न करणार?

तसेच या भागातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा याबाबत जागृत असणे महत्त्वाचे आहे मात्र असे इथे होतांना दिसत नाही. फक्त निवडणुकीच्या वेळेस मत मागण्या करिताच यांच्या दरवाजाच्या पुढे येतात, आश्वासने देतात, प्रलोभने देतात मात्र एकदा निवडणुका संपल्या की पाच वर्ष त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ही शोकांतिकेची बाब आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here