२०० पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविणारे आरिफ खान कोण होते?…जाणून घ्या

न्यूज डेस्क – कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करणारे कोरोना योद्धे आरोग्य कर्मचारी, पोलिस, बँक कर्मचारी या सोबतच अनेक लोकांनी आपल्या ज्यांनी संकटकाळात आम्हाला सुरक्षित ठेवले. यात महत्वाची भूमिका असणार्यापैकी रुग्णवाहिका सेवा देणारे यांनीही आपले प्राण पणाला लावून सेवा दिली.

दिल्ली सीलमपूर येथे राहणारा कोरोनाने आपला जीव धोक्यात घालून आणि 200 पेक्षा जास्त रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून त्यांचे जीव वाचविणाऱ्याच कोरोनाने मृत्यू झाला. 25 वर्षे शहीद भगतसिंग सेवा दलाशी संबंधित असलेल्या आरिफ खानला कोरोना विषाणूची लागण झाली होती. आरिफ खान बद्दल जाणून घेवूया.

शनिवारी सकाळी हिंदुराव यांचे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. आरिफ खान कोण होते , ज्यांच्या निधनाने उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

दिल्लीच्या सीलमपूर भागात राहणारा आरिफ खान कोरोना कालावधीत 200 पेक्षा जास्त रुग्णांना वेळेवर रुग्णालयात घेऊन गेला होता. यासह, 100 हून अधिक मृतदेह स्मशानभूमीत नेवून रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले.

आरिफ खान गेल्या 25 वर्षांपासून शहीद भगतसिंग सेवा दलाच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत होते.संस्थेकडून आरिफ विनामूल्य रुग्णवाहिका सेवा पुरवत असे. त्याला संस्थेकडून १५ हजार रुपये मात्र मानधन मिळत असे ते आपल्या परिवारासाठी,परिवारात एकूण पाच लोकांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती.

ते गेल्या २१ मार्चपासून संक्रमित रूग्णांना त्यांच्या निवासस्थानावरून रुग्णालयात आणि क्वारानटाईन केंद्रात नेण्याचे काम करीत होता. आरिफ खान मुस्लिम असूनही त्यांनी 100 पेक्षा जास्त हिंदूंच्या पार्थिवावर स्वत: च्या हातांनी अंत्यसंस्कार केले. हे कार्य करीत असलेल्या धर्म आणि जातीपेक्षा कितीतरी उच्च आहे हे त्याचे व्यक्तिमत्व दर्शवते.

आरिफ खान कोरोना संक्रमित रुग्णासाठी 24 तास उपलब्ध असत त्यांना मोबाईलवर माहिती मिळाल्यावर कोरोना रूग्णांना घरून आणणे त्यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करणे. जर कोणाचा मृत्यू झाला तर मृतदेह घेवून शेवटच्या संस्कारांसाठी स्मशानात घेवून जाणे त्याच्यावर हिंदू रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करून परत आणखी दुसर्या रुग्णाला रुग्णालयात पोहचविणे हा त्यांचा नित्यक्रम असायचा यात त्यांची कोणतेही तक्रार किंवा थकवा नव्हता ते सहजपणे काम करत असत.

रुग्णांना पोहचवीत असताना त्यांची 3 ऑक्टोबरला तब्येत ढासळली तरीही कोरोना संक्रमित रुग्णालयात जात होते. शहीद भगतसिंग सेवा दलाने आतापर्यंत एकूण 623 कोरोना-संक्रमित लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यामध्ये 200 पेक्षा जास्त रुग्णांना आरिफने हलविले.

शहीद भगतसिंग सेवा दलाचे संस्थापक जितेंद्रसिंग शांती म्हणाले की, मुहम्मद आरिफ खान एक अतिशय प्रामाणिक आणि साधे व्यक्ती होते. जर एखाद्या रुग्णाचा फोन त्याच्या फोनवर आला असेल तर तो आपले वैयक्तिक काम सोडून ताबडतोब त्याला मदत करायला तयार होईल.

तो संसर्ग होईपर्यंत कोरोना रूग्णांची सेवा करत राहिला. साधारण साडेसहा महिने तो घरीही गेला नाही. त्याने रुग्णवाहिका पार्किंगमध्ये तळ ठोकला होता . जेव्हा जेव्हा त्याला घरी जाण्यास सांगितले जात असे पण घरात न जाता बाहेरून आपले साहित्य घेवून परत कामावर हजर व्हायचे ,घरी गेल्यावर कुटुंबास संसर्ग होण्याचा धोका निर्माण होईल या भीतीने तो घरी जाण्याचे टाळायचा.

शनिवारी दि.१० ऑक्टोबर ला त्यांचे सकाळी हिंदुराव यांचे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले.आरिफच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अश्या कोरोना योद्ध्याला महाव्हाईस चा सलाम…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here