दिव्याखाली अंधार… आरटीओ ऑफिसच्या बाहेर PUC प्रमाणपत्र देणाऱ्यांचीच अवस्था दयनीय..!

न्यूज डेस्क :- आपण नेहमी रस्त्यावर आपली दुचाकी वा चारचाकी घेऊन फिरत असतो,तेव्हा जर कधी आपल्याला वाहतूक शाखेच्या पोलीसाने पकडले तर त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे मागितली जातात जसे की लायसन्स,आर सी बुक वा इतर आणखी चौकशी केली जाते.पण वाहनधारकाकडे हे सर्व उपलब्ध असले की त्यांच्याकडून मग सर्वात शेवटी PUC प्रमाणपत्र मागितले जाते.

तेव्हा ते आपल्याकडे उपलब्ध नसते अशावेळी दंड ठोठावला जातो.अण मग आपण जेव्हा आपल्या वाहनांची PUC टेस्ट करायला प्रदूषण तपासासाठी उपलब्ध असलेल्या वाहन केंद्राकडे जातो अन ते मग आपल्या खिश्याला कात्री मारत आपल्याला PUC प्रमाणपत्र देतात तर ते खरंच चाचणी करून दिलेलं असते का.?

याची शहानिशा न करता आपण निघून जातो तेव्हा आपल्याला बनावट PUC प्रमाणपत्र देणाऱ्यांची व स्वतः त्यांच्याच गाडीतून प्रचंड धूर निघून प्रदूषण वाढायला तेच कारणीभूत ठरत आहे अशा नकली PUC केंद्राची पोलखोल ‘महाव्हॉईस न्यूज’ ने अशी उघड केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here