मुर्तिजापुर तालुक्यातील धामोरी ते म्हसला रस्त्याला वाली कोण..?

शेकडो वर्षापासून रस्ता विकाच्या प्रतिक्षेत. पावसाळ्यात तुटतो अनेक गावांचा संपर्क.
वाहनधारक तथा विद्यार्थी त्रस्त. लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष
.

मुर्तिजापुर ग्रामीण – गोपाल ठक

मुर्तिजापुर पंचायत समीती अंतर्गत येत असलेल्या व संताची भुमी नावलौकीक प्राप्त धामोरी या ग्राम मधुन जाणाऱ्या धामोरी ते म्हसला दिड कि मी अंतर असलेला रस्ता खुप वर्षापासुन विकासाच्या प्रतिक्षेत आहे.

धामोरी येथुन जवळ असलेली खुप मोठी बाजारपेठ कामरगाव तालुका कारंजा ही फक्त ८ कि मी अंतरावर असून या रस्त्यावर ग्रामस्थ तथा वैद्यकिय सेवा घेण्याकरीता रुग्ण यांची खुप मोठी वर्दळ राहते. रस्त्याची पार्श्वभुमी पाहील्यास धामोरी येथून दिड कि मी अंतरावर वाशिम जिल्हयाची हद्द सुरु होते.

हा संबंधीत रस्ता बांधकाम विभाग ता. कारंजा यांच्या अख्त्यारीत जातो. त्यामुळे नेमका या रस्त्याचा विकास कोण करणार याचं कोड सर्व ग्रामस्थांना पडले आहे. अभावी आजवर विकास थांबला असून अपघात होण्याची शक्यता बळावत आहे.

या रस्त्याविषयी अनेकदा निवेदन दिले असता संबंधीत विभाग तथा लोकप्रती नीधी यांनी केराची टोपली दाखवत हेतुपुरस्पर डोळेझाक केले असल्याचे ग्रामस्थ बोलत आहे. संबंधीत रस्त्याची दखल वरीष्ठ पातळीवर घ्यावी व रस्त्याचा विकास जलदगतीने व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी जोर धरीत आहे.

अनेकदा या रस्त्याविषयी निवेदन दिले मात्र लोकप्रतिनीधी तथा संबंधीत विभागाने कुठलीही दखल घेतली नाही.परीणामी रस्ता विकापासून वंचीत आहे – बाळासाहेब देशमुख ( जेष्ठ नागरीक, धामोरी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here