कोण आहेत NCB अधिकारी समीर वानखेडे?…वडिलांचा शाळेचा दाखला सोशल मिडीयावर होत आहे व्हायरल…

फोटो- सौजन्य सोशल मिडिया

न्यूज डेस्क – राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे असे ट्वीट केल्यानंतर समीर वानखेडे यांनी माझ्या मूळगावी जाऊन तपासा असे सांगितल्या नंतर सोशल मिडीयावर समीर वानखेडे यांचा वडिलांचा शाळेचा प्रवेश केल्याचा दाखला सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

समीर वानखेडे हे मुळचे विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या पत्रावरून माहिती मिळत असून त्यांचे काका सध्या वाशिम येथे राहतात, त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांचे भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे 1975 च्या जवळपास त्यांनी गाव सोडून नोकरी निमित्य मुंबईला गेले असल्याचे सांगितले आहे. ते मुंबई ला लोखंडवाला परिसरात राहत असल्याने त्यांना टोपण नाव दिल असेल, माझ्या भावाचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हेच तर पुतण्याचे समीर ज्ञानदेव वानखेडे हेच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलय.

समीर ज्ञानदेव वानखेडे यांच मुळं गाव हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड तोफा हे असून, या गावात त्यांची वडिलोपार्जित घर जमीन आहे. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त असून, सध्या वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत.

हेच ते व्हायरल पत्र समीर वानखेडे यांच्या वडिलांचे शाळेचा दाखला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here