पूरग्रस्त भागात दौरा करतांना आजीमाजी मुख्यमंत्री आमने सामने…आणि मग…

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेस्क – राज्यात पूरग्रस्त भागात अतोनात नुकसान झाले असून या भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुसरीकडे विरोधी पक्ष एकाच भागात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. आज मुख्यमंत्री यांनी कोल्हापूर जिल्ह्यात दौरे सुरु केला पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली.

तर कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान, हे दोन्ही दिग्गज आमने-सामने आल्याची घटना घडली. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याचेही दिसून आले. कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात हे आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर आले होते.

यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली केली. तर, यावेळी शिवसैनिकांकडून ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप दिल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहुपुरीतच थांबले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या वेळी फडणवीसांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती. या भेटीमुळे आता विविध राजकीय चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.

या भेटीबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे मागील काही दिवसांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनतेमध्ये संतप्त भावना दिसून येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांता निरोप आला की आम्ही येत आहोत, तुम्ही थांबलात तर बरं होईल. मुख्यमंत्र्याचा अशाप्रकारचा निरोप आल्याने आम्ही थांबलो व ही भेट झाली. यावेळी परिस्थितीतून तातडीने मार्ग काढावा लागेल, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here