गोंदियात पशुधन पर्यवेक्षकाला ८ हजाराची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले…

फोटो सौजन्य गुगल

अमरदिप बडगे
गोंदिया प्रतिनिधी

गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयातील पशुधन पर्यवेक्षक संजय सव्वालाखेला 8हजाराची लाच घेताना आज 25नोव्हेबरला लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार हा एक शेतकरी असुन शासनाच्या मराठवाडा पैकेज योजने अंतर्गत शेळी गट मंजूर झाले.व शेळी गट खरेदी केल्यानंतर पहील्या टप्पातील रक्कम खात्यात जमा झाली.परंतु दुसऱ्या टप्प्यात रक्कम खात्यात केव्हा येणार व खात्यात जमा होणार आहे.असे विचायला गेलेल्या शेतकऱ्यांला दुसऱ्या टप्प्यातील रक्कम खात्यात जमा होण्याकरिता 10हजार रूपये लागतील असे पशुधन पर्यवेक्षक संजय सव्वालाखे याने शेतकऱ्यांला सांगीतले.

तकारदार शेतकऱ्यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने 23 नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठून तक्रार दाखल केली.त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 25नोव्हेबरला गंगाझरी बसस्थानक परिसरात 8 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद तोतरे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पुरुषोत्तम अहेकर,व पथकातील टीमने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here