सांगली जिल्ह्यातील खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधींचे केंव्हा लक्ष जाणार? राष्ट्र विकास सेनेचा सवाल…

सांगली – ज्योती मोरे.

राष्ट्र विकास सेनेच्या वतीने, सांगलीत महापालिका क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील रस्त्या वरील खड्ड्यांचे पोस्टर प्रदर्शन करून अनोखे आंदोलन करण्यात आले.
सध्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रातील तसंच जिल्ह्यातील इतर भागातील रस्त्यांची अवस्था चाळणी सारखी झाली आहे.

या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे, यमराजाला सोबत घेऊन फिरल्यासारखे आहे. या रस्त्यामुळे आजपर्यंत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत.दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि जिल्हा प्रशासन या खड्ड्याकडे कधी लक्ष देणार आहेत?

असा प्रश्नही, राष्ट्रीय विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी उपस्थित केलाय.यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष महेश महाजन, युवा नेते सॅमसंन मोरे, मिरज तालुका अध्यक्ष सीताराम वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here