Thursday, June 1, 2023
Homeराज्यशेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता कधी मिळणार - नवीन अपडेट...

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता कधी मिळणार – नवीन अपडेट समोर…

शेतकऱ्यांना आता १४ व्या हप्त्याच्या रकमेसाठी जास्त थांबावं लागणार नाही…

अमोल साबळे

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांप्रमाणं ६ हजार रुपयांची रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

पीएम किसान निधी योजना १४ वा हप्ता कधी मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना सुरु केली होती. त्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत १३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. शेतकरी आता १४ व्या हप्त्याची रक्कम कधी येणार याची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना आता १४ व्या हप्त्याच्या रकमेसाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही. माध्यमातील रिपोर्टनुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्या शेतकऱ्याकडे जमीन असणं आवश्यक आहे.

पीएम किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याची रक्कम २७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना त्यांचं रेकॉर्ड अपडेट नसल्यानं मिळाली नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी ते पूर्ण केलं असेल त्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: