नववधू घरी पोहचल्यावर स्वागत सुरु असतांनाच पोलीस झाले दाखल…मग घडले हे नाट्य…

छत्तीसगड – बालोद जिल्ह्यातील कुर्डी गावात लग्न आटोपून परत सासरी आल्यावर वधू-वरांचे स्वागत सुरु होते. इतक्यात पोलिस आले आणि त्यांनी वराला ताब्यात घेतले. लग्न विधीही पूर्ण होऊ दिला नाही. पोलिसांची ही कारवाई पाहून नातेवाईकांनाही काही समजू शकले नाही. मुलीच्या बाजुच्या मंडळींना आश्चर्य वाटले. नंतर वराने केलेल्या गुन्ह्याची माहिती समोर आली.

बालोद जिल्ह्यातील अर्जुंडा पोलिस स्टेशन परिसरातील कुर्डी खेड्यातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय लिकेश साहूचे लग्न 25 जूनपासून सुरू झाले होते. त्या दिवशी संपूर्ण विधी पार पडले आणि दुसर्‍या दिवशी म्हणजेच 26 जून रोजी वर, त्याचे कुटुंबातील सदस्य आणि काही साथीदार मिरवणुकीस गेले. आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होते. पण त्या रात्री वधू परत तिच्या गावी परत येताच, 27 जून रोजी सकाळी वरचे नातेवाईक नवविवाहितेचे स्वागत करत होते, याचदरम्यान देवरी पोलिस स्टेशनची टीम दाखल झाली आणि मग वारला ताब्यात घेतली. मग नातवाईही वरच्या पोलीस ठाण्यात पोहचले.

ठाण्यात गेल्यावर हि माहिती समोर आली, देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुलीने कुर्डी येथे राहणार्‍या लिकेश साहूवर शारीरिक शोषण (बलात्कार) केल्याचा आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षांपासून त्याच्याशी लिकेशचे प्रेमसंबंध होते. यादरम्यान, त्याने लग्नाच्या बहाण्याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवले, परंतु लग्न दुसर्‍या मुलीशी केले. मुलीच्या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी कलम 376(2)(n)-IPC अंतर्गत युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करत या युवकास अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here