व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादातून झालेल्या हाणामारीत महिलेचा मृत्यू…बोईसर येथील घटना…

बोईसर शिवाजीनगर येथे राहणाऱ्या लीलावती देवी प्रसाद (वय ४८) यांचा तारापूर एमआयडीसी मधील तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेला १० फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी त्यांच्या राहत्या घरी ७ ते ८ जणांनी भांडण करून मारहाण केल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारार्थ तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

मयत महिलेच्या मुलीने काही दिवसापूर्वी मोबाईल व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवलेल्या मेसेज वरून मनात राग धरून कॉलेजमध्ये तिचे भांडण झाले होते. या भांडणाचे पडसाद तिच्या राहत्या घरी थेट शिवाजीनगर येथे नवीन वस्ती मध्ये पोचुन या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. एका कुटुंबातील सहा जणांनी प्रसाद यांच्या कुटुंबातील मुली व त्यांची पत्नी लीलादेवी यांना मारहाण करण्यात आली होती.

शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर येथे झालेल्या घटनेमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आले आसल्याचे बोईसर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here