‘त्या’ जंगलातील घटनेचे काय आहे रहस्य ?वनाधिकारी घाबरून का शोधताय पळवाटा… कुठे गेला तो वनमजुर ?…अवश्य वाचा

भंडारा : विपुल वनसंपदा असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील एका जंगलात मागील १५ दिवसांपूर्वी असे काय घडले, ज्यामुळे येथील वनाधिकारीचं नाही तर वनमजुरही घाबरू लागले आहेत.

आपल्यावर मोठे संकट ओढावेल याची कल्पना ‘या’ सर्वांना आली आल्याने सर्वांनी हातवर करण्याचा अफलातून प्रकार जरून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. कालपर्यंत कार्यरत एक वनमजुर आज सकाळपासून त्याच्या जुन्या कर्तव्याच्या जागेवरून गायब झाला.

तो गायब झाला की, त्याला तडकाफडकी दुसरीकडे हलविले? मग प्रश्न निर्माण होतो की, असे का झाले असावे, ज्यात सर्वच एकमेकांकडे बोटं दाखवीत आहेत.

तलावांचा जिल्हा म्हणून जशी भंडाऱ्याची ओळख आहे. तसेच भंडाऱ्याला धान उत्पादकांचा जिल्हा म्हणूनही राज्यात ओळख निर्माण झाली आहे. अशा या विपुलतेने नटलेल्या जिल्ह्यात वनसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यातील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे.

यातील काही क्षेत्र वन्यजीवांसाठी राखीव करण्यात आला आहे. अशाच वनसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यातील एका जंगलात मागील पंधरा दिवसापूर्वी नियमबाह्यरित्या एक प्रकार घडला. हा प्रकार येनकेन प्रकारे दडपण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू झाला.

मात्र, कोंबड्याला कितीही झाकून ठेवले तरीही तो पहाटेला बाग (आरवतो) देतोच. असाच काहीसा प्रकार सध्या भंडारा जिल्ह्यात चव्हाट्यावर आला आहे.

जंगलातील एक विपुल असलेल्याची कुर्‍हाडीने घाव घालून फाडश्या पाडला. त्याची वन मजूरांच्या माध्यमातूनच विल्हेवाट लावण्यात आली. या विल्हेवाटीचा प्रकार हळूहळू बाहेर पडू लागला आहे.

दरम्यान, या प्रकरणातून स्वतःची सहीसलामत सुटका व्हावी यासाठी या प्रकरणात गुंतलेल्या वन अधिकाऱ्यांकडून एकमेकांना “हाके” मारून कारवाईच्या नावावर थातुरमातुर कागद रंगविण्यात आली आहे.

वास्तविकतेत पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या या प्रकरणात “जाबहा” चा सिंहाचा वाटा असल्याचे वनमजूर यांनी सांगितले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्याने या जंगलाच्या सुरक्षेसाठी असलेला “भगवान”चं गायब झाला आहे.

वास्तविकतेत या भगवानाला इतरत्र हलविल्याने सर्वांची यातून सुटका होईल, असा वनाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणात सर्वांच्या नजरा ‘भगवान’वर लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here