काय सांगता !…’नीरज’ नावाच्या व्यक्तींसाठी मिळणार मोफत पेट्रोल..!

न्यूज डेस्क – समस्त भारतीयांची मान गौरवाने उंचविणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. संपूर्ण भारतात त्याचा नावाचा लौकिक होत असताना आता त्याच्या नावाच्या लोकांनाही लाभ मिळणार आहे. तर गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील नेत्रंग या छोट्या शहराच्या SP पेट्रोल पंपाच्या मालकाने एका वेगळ्या पद्धतीने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्याचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

चक्क या पेट्रोल पंप मालकाने काल रविवारी त्याच्या पंपावर एक बोर्ड लावला. ज्यामध्ये असे लिहले नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५०१ रुपयांचे मोफत पेट्रोल मिळेल, असे बोर्डावर लिहिण्यात आले आहे. नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला आपले ओळखपत्र दाखवून मोफत पेट्रोल मिळत आहे.

एवढेच नव्हे, तर मालकाने त्याच्या पंपावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नीरज नावाच्या व्यक्तींचे मनापासून स्वागत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसपी पेट्रोलियमच्या मालकाने सांगितले, की ही ऑफर नीरज चोप्राच्या विजयाच्या सन्मानार्थ देण्यात आली आहे.

Courtesy – Vibes of India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here