अज्ञात ट्रकला चारचाकी वाहनाची धडक नऊ जण जखमी…देवदर्शनाकरिता गेलेले भाविक थोडक्यात बचावले हरणाकुंड शिवारातील घटना…

देवलापार -पुरुषोत्तम डडमल

नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर नागपूर कडून सिवनीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एम पी-३६/सी. २३६८ ने अज्ञात ट्रकला समोरून जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात चालकासह नऊ जण जखमी झाल्याची घटना दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली.अपघातात सुदैवाने सर्वजण थोडक्यात बचावले.

प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेश राज्यातील सागर येथील भाविक देवदर्शनाला नागपूर ला आले होते. देवदर्शन करून आपल्या गावी सागर येथे नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने परत जात असताना आज शुक्रवारला दुपारी २:३० वाजताच्या सुमारास हरणाकुंड शिवारात आल्यावर चालकाला झोपेची डुलकी आल्याने समोरील अज्ञात ट्रकला वाहन क्रमांक एम पी-३६/ सी-२३६८ने जोरदार धडक मारल्याने हा अपघात झाला.

यात चालक संदीप बलराज पटेल(३५),रा. बमोरा (सागर),पप्पु बन्सी कोरकू(५२),विनय पप्पु कोरकु(२२),लक्ष्मी अनिल कुचवंदिया(३०),राजेश्वरी बलराम कोरकु(२४),लखन पप्पु कोरकु(२५),रिना दिपक ठाकुर(३५),गिता कोरकु (४२),नियम पप्पु कोरकु(१९) सर्व राहणार रहपुरा जि सागर मध्यप्रदेश हे अपघातात जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी पोहचून जखमींना देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डॉक्टरांनी जखमींवर प्रथोमपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडीलक व मेयो रुग्णालयात हलविण्यात आले.सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेच्या वेळी गाडीत एकूण नऊ भाविक प्रवास करीत होते.अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.सदर घटनेचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here