आठवडी बाजार परिसरात घाणी च्या साम्राज्याने नागरिक हैराण, दैनंदिन भाजीपाला हर्राशी इतरत्र भरवण्याची नागरिकांची मागणी…

पातूर – निशांत गवई

पातूर येथील नप व शिर्ला ग्रामपंचायत यांच्या ह्ददी च्या वादामध्ये सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची परीस्थीती समोर येत आहे पातूर येथील दैनंदिन भाजीपाला हराशी हि अगोदर गुजरीलाईन येथे भरवली जात होती परंतु कोरोना काळात प्रशासनाने गर्दी होत असल्याच्या कारणाने हि हराशी गुरुवार पेठ रहिवाशी भाग असलेल्या रोड वर भरवण्यास तातपूरती मंजुरी दिली होती परंतु आज रोजी हि बाब रहिवाशी नागरिकांच्या आरोग्याचा दृस्तीने घातक ठरत असल्याचे दिसत आहे.

कारण सादर भाजीपाला हराशी झाल्यावर तेथे राहिलेल्या उर्वरित भाजीपाला हा तसाच पडून सडतो परंतु त्याची विलेवाट न न प प्रशासन लावते ना ग्रामपंचायत प्रशासन तसेच भाजीपाला हराशी मुळे मे महिन्यात सदर भागातील मोठी नाली ब्लॉक झाल्यामुळे दुशीत सांडपाणी हे रस्त्यावर वाहत होते तसेच मार्निंग वॊक व इव्हीनिंग वॊक करणाऱ्या नागरिकांना ,महिलांना सदर प्रकारचा खुप मनस्ताप होत असल्याचे दिसत आहे.

या हराशी मुळे आबाल वृद्धांची सकाळची झोप मोड होत आहे कारण रात्री 10 वाजता पासून मोठं मोठे वाहने येऊन सकाळी 7 वाजेपर्यंत येथे तौबा गर्दी तर असते पण नागरिकांचा गोंगाट हा झोपलेल्या गुरुवार पेठ वासीयांची डोके दुखी ठरत आहे आज रोजी सुद्धा या घाणी मुळे गुरुवार पेठ भागातील 5 ते10नागरिकांना डेंग्यू मलेरिया झाला आहे.

संबधित प्रकारावर आज रोजी गुरुवार पेठ येथील नागरिकांनी मुख्याधिकारी नप ,तहसीलदार,व ग्रामसेवक शिर्ला आज तक्रार निवेदन देऊन दैनंदिन होणारी भाजीपाला हराशी इतर कोणत्याही जागेवर करण्यात यावी अशी मागणी केली तसेच या भाजीपाला हराशी साठी प्रशासनाजवळ संपूर्ण आठवडी बाजार खुला असताना नागरी वस्ती मध्ये हराशी भरवण्याचा उद्देश काय?हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

संबधीत हराशी जर बंद केली नसल्यास आंदोलनाला सामोरे जाण्याची प्रशासनाने तयारी ठेवावी असे सुद्धा काही नागरिकांनी बोलून दाखवले या निवेदनावर सचिन बारोकार,प्रकाश वालोकार,किशोर पोपळघट,संजय गाडगे,मुन्ना पोपळघट,अजय इंगळे,सचिन पोपळघट,अश्विनी गाडगे,सविता बारोकार,विजय पोपळघट,बाळू चतरकर,गीता पोपळघट, ज्योती वालोकार, सुशिलाबाई पोपळघट, दीपाली चतरकार, सोनम पोपळघट, दिलीप इंगळे, गजानन बारोकार, अनिता पोपळघट, ज्योती चाफेकर,व इतर नागरिकांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here