Aadhaar Card वर नवीन मोबाईल क्रमांक घरबसल्या अपडेट कसे होणार..? 

गौरव गवई

मोबाईल नंबर तुमच्या घरी पोहोचवण्यासाठी तुम्हाला पोस्टमनची मदत घ्यावी लागेल. पोस्टमन तुमच्या घरी येईल आणि आधार कार्डमधील मोबाईल नंबर अपडेट करेल.

यासाठी तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक [India Post Payments Bank (IPPB)] सरकारी पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलद्वारे आधारशी संबंधित अनेक कामे केली जातात.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी, पोर्टलवर डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म (DOORSTEP BANKING SERVICE REQUEST FORM) भरावा लागेल.

यानंतर तुम्हाला आधार मोबाईल नंबरचा पर्याय निवडावा लागेल. आता संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल..

आता जवळच्या शाखेतून फोन येईल आणि मग पोस्टमन घरी येईल. मोबाईल अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल. जर कॉल आला नाही तर 155299 वर कॉल करा.

महाव्हॉईस न्युज ला गुगल न्यूज आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...