संदीप सिंग याची चौकशी करण्यासाठी आम्ही सर्व तक्रारी सीबीआयला देऊ…गृहमंत्री

न्यूज डेस्क – अभिनेता सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणी ड्रग कनेक्शनसंदर्भात संदीपसिंहचे नाव जोडले गेल्याने व भाजपाशी त्याचे असलेले घनिष्ठ संबंध पाहता ड्रग माफियांशी भारतीय जनता पक्षाचा काही संबंध आहे का, याची चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी काँग्रेस कडून करण्यात आली असताना,राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत असतानाच त्यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा उल्लेख झाल्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला.

सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला अंमली पदार्थ दिल्याचा आरोप काही whatsapp वर संवादांचा आधार घेत करण्यात आला. त्यावरून भाजपानं आरोप केले होते. त्यानंतर काँग्रेससह काहीजणांनी संदीप सिंह आणि भाजपा यांचे संबंध असल्याचा दावा केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातच संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधाचा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. याप्रकरणी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणारा संदीप सिंह आणि भाजपा यांचे संबंध असून त्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.

काही जणांनी तशी विनंतीही केली आहे. त्याचा संबंध बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणाशीही आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती मी सीबीआयकडे करणार आहे,” असं देशमुख यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here