आम्ही भारतीय परिवार द्वारा पूरग्रस्तांना मदत करून स्मृतिदिवस साजरा…

रामटेक – राजु कापसे

२९ ऑगस्टला पेंच धरणातील पाणी सोडल्याने आलेल्या महापुरामुळे पेंच नदी किनाऱ्यावरील गावातील शेतकरी शेतमजूर व नागरिकांचे अनन्यसाधारण नुकसान झाले. महापुराने अनेकांचे संसार वाहून नेले. या पूरग्रस्तांच्या स्थितीचा आढावा घेतला असता त्यांच्या पुढे जगण्याचे भीषण प्रश्न उभे ठाकले आहेत.

आकाशझेप फाउंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान तर्फे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांचे वडील दिवंगत बालचंद गणबा कडबे यांच्या अकराव्या स्मृतीदिनाप्रीत्यर्थ पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा व पाली (उमरी) या पूरग्रस्त गावातील पीडितांना अन्नधान्य व किराणा वस्तूचे वितरण करून दिवंगत बालचंद कडबे यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दूनेदार, कोषाध्यक्ष दिलीप पवार, सहसंयोजक सुरेंद्र सांगोडे, सदस्य दुतियोधन कडबे, प्रशांत तुरणकर, अभय चकबैस, पत्रकार गोपाल कडू व ईश्वर खंगार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पाली (उमरी) येथील पूर पीडित शेतकरी व शेतमजूर सुखदेव राऊत, ज्ञानदेव राऊत, मनोहर भगडकर, अतुल भागडकर, नरेश राऊत, गजानन सरवरे, शकुनबाई राऊत, बळीराम शेंदरे, कवडू चंदनकर,

श्रीराम शेंदरे, ईश्वर भागडकर, नेऊरवाडा येथील राजकुमार खंडाळे, कवडू खंडाते, रामा पंधरे, धर्मेंद्र शास्त्रकर, अशा बेदरे, सुनंदा नेवलकर, भारत खंडाते, आम्रपाली चौरे, मंगेश खंडाळे, धनिराम पंधरे अशा एकवीस कुटुंबीयांना मदतीचा हात देत पारशिवनी व मौदा तालुक्यातील पूर पीडितांना मदत करण्यासाठी भारतीय समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शकुंतला कडबे, अर्चना कडबे, ज्योती कडबे, मैत्री, मंतव्य, ऋतुजा, जागृती व कडबे परिवाराने महत्त्वपूर्ण योगदान दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here